Pune Crime l घरगुती वादातून पुतण्याने साथीदारासोबत कोयत्याने वार करत चुलत्याला संपवलं

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मावळ : प्रतिनिधी
घरगुती वादातून पुतण्यासह एकाने चुलत्याच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना दि. ४ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास धामणे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तालीम ता. मावळ जि. पुणे येथे घडली. 
            महादेव भगवान गराडे (वय ७३, रा. धामणे ता. मावळ) असं हत्या झालेल्या चुलत्याचं नाव आहे. मंगेश किसन गराडे (वय ३८, रा. धामणे मावळ) आणि एक अनोळखी असे या हत्येती आरोपी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महादेव गराडे आणि आरोपी मंगेश गराडे यांच्यात सतत घरगुती वाद होते. त्यातून आरोपी मंगेश गराडे आणि त्याच्या एका साथीदाराने मयत महादेव गराडे यांच्या मानेवर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने महादेव गराडे यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
To Top