सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूम येथे शाळेचे संकेतस्थळ सुविधांचे उदघाटन करण्यात आले. यात शाळेची सखोल माहिती, तसेच विविध उपक्रम, ऑनलाईन अर्ज सुविधा यांविषयी माहिती देण्यात आली असून बारामती तालुक्यातील एकमेव शाळा जिथे वायफाय कॅम्पस व शाळेची स्वतःची वेबसाईट आहे.
शुक्रवार दिनांक ४ रोजी मुरूम प्राथमिक शाळेचा इयत्ता चौथीच्या वर्गाचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..या कार्यक्रमास भा.ज.पा बारामती तालुकाध्यक्ष पी.के.आण्णा जगताप, प्रदीप कणसे, प्रशिल जगताप, रहमतुल्ला इनामदार, नुसरत इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापिका संगिता घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. संगीता जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अलका खोमणे यांनी आभार मानले.