Purandar News l पुरंदर तालुका पश्चिम मंडल भाजपा अध्यक्षपदी संदिप कटके

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
‌भाजपा पुरंदर तालुका पश्चिम मंडलच्या अध्यक्षपदी भिवरी येथील रहिवाशी व भिवरी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन संदिप बबन कटके यांची  निवड करण्यात आल्याची घोषणा पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष व पुरंदरचे निरीक्षक दिपक शंकर रजपूत यांनी पत्रकार परिषदेत केली.
            यावेळी भाजपाचे पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश जगताप, सरचिटणीस गणेश मेमाणे, पश्चिम हवेली तालुका अध्यक्ष जिवन वाव्हळ, पुरंदर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष दिलीप कटके, सरचिटणीस संदीप नवले, किरण कटके, महेश राऊत, दीपक जावळे, मोहन गायकवाड, अमोल कटके, मनोज घिसरे, योगेश कटके, गोरक्षनाथ मांढरे, धोंडीबा कटके, साहूराज जाधव, समीर भिसे, दादा चावीर, जयवंत साळुंके सुनील ढवळे, बापु कटके, विठ्ठल कटके, समीर तरवडे,जयवंत साळुंके, सुनील ढवळे, राहुल कटके, दादासो कटके, विठ्ठल कटके, योगेश जगदाळे, सुरज अवचरे सुदर्शन कुदळे आदी उपस्थित होते. 
            पुरंदर तालुका स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही निवड करण्यात आली असून नूतन अध्यक्ष पक्ष वाढीसाठी निश्चितपणे काम करतील अशी खात्री निरीक्षक दिपक रजपूत यांनी दिली.


To Top