सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
इंदापूर_पुणे, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांना वरदायिनी समजले जाणारे उजनी धरण चल साठ्यातून अचलसाठ्याकडे वाटचाल करीत आहे. वास्तविक पाहता उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याला पिण्याच्या नावाखाली पाणी सोडले जात आहे.
पंढरपूर, सांगोला, या नगरपालिका व सोलापूर महानगरपालिका यांना पिण्यासाठी नदीद्वारे किंवा विद्युत ग्रहाद्वारे पाणी सोडले जात आहे. दररोज उजनी धरण हे एक ते दीड टक्का कमी होत आहे. आज मी तिला सकाळी उजनी धरण हे 3.56% होते. त्यामुळे चलसाठा संपत आला आहे. येत्या दोन दिवसात उजनी धरण अचलसाठ्यात जाऊन काही दिवसात नृत्य साठ्यात जाऊ शकते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अर्थात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. उजनीच्या सम नियोजन पाणी वाटप बाबत कोणीच आवाज उठवत नसल्याने आता मी करायची काय? असा सवाल उजनीच्या पाणलोट लगतच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. धरण उशाला... कोरड घशाला... अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या नावाखाली दररोज उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याला पाणी सोडले जात आहे. मात्र हे पाणी पिण्यासाठी आहे की, शेतीसाठी असा प्रश्न सुद्धा पाणलोटलगतच्या शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे उजनीच्या सम नियोजन पाणी वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे कधी पार पडणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. दररोज पाणी पातळी कमी होत असल्याने पाणलोटलगतचे शेतकरी विद्युत पंप पुढे घेत आहेत. तसेच पाईपची संख्या वाढवावी लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने आलेली पिके आता कशी वाचवायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत उजनी धरणात 1. 91 टीएमसी पाणीसाठा आहे. अजून पावसाळ्याला दीड ते पावणे दोन महिने कालावधी आहे. असे असतानाच उजनी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. धरणाची निर्मिती जरी सोलापूर जिल्ह्यात असली तरी, संपूर्ण पाणलोट क्षेत्र मात्र इंदापूर तालुक्यात आहे. उजनी धरणाचे निर्मिती वेळी तालुक्यातील हजारो एकर शेतकऱ्यांनी दिली. असे असताना आमच्या हक्काचे पाणी आरक्षित न करता सोलापूर जिल्ह्याला पिण्याच्या नावाखाली का सोडली जाते याबाबत आहे. सोलापूर जिल्ह्याला जरूर पिण्यासाठी पाणी सोडलेच पाहिजे, मात्र सतत पिण्याच्या नावाखाली हे पाणी शेतीला जात असल्याचा अंदाज अनेक शेतकऱ्यांनी वर्तविला. त्यामुळे शासकीय पातळीवर उजनीच्या पाण्याचे समान वाटप करून निर्णय होणे गरजेचे आहे.