सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
आईकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा राग मनात धरत मुलाने एका ५८ वर्षीय जेष्ठाचा खून करून त्याचा मृतदेहाला साडीला दगड बांधत विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील खंडाज येथे घडला आहे. याबाबत माळेगाव पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
खांडज (ता. बारामती) येथील राऊतवस्ती येथे मारुती साहेबराव रोमण (वय ५८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खून करून त्यांचा मृतदेह एका विहिरीत टाकण्यात आला. ही घटना दि. ७ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी माळेगाव बुद्रूक पोलिस ठाण्यात विजय मारुती रोमण यांनी फिर्याद दिली आहे. दि. ५ ते ७ मे या दरम्यान ही घटना घडली. मारुती रोमण यांच्यावर कोणत्या तरी टणक वस्तूने प्रहार करत त्यांचा खून करण्यात आला. मृतदेहाच्या गळ्यामध्ये काळ्या रंगाची साडी बांधत त्यात दगडे बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह कांतीलाल सयाजी माने यांच्या विहिरीत टाकला गेल्याचे उघड झाले आहे. याबाबत माळेगाव पोलिसांनी नवनाथ शिवाजी घोगरे, वय 25 वर्षे, मुळ रा. कार्ले भाजी लोणावळा ता. मावळ जि. पुणे, अनिल गोविंद जाधव, वय 35 वर्षे मुळ रा. आंबेवाडी ता. रोहा जि. रायगड यांना अटक करणेत आलेली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मारुती साहेबराव रोमन हे अधुन मधुन मजुरांचे खोपीवर येत जात होता, याच ओळखीतुन मारुती साहेबराव रोमन याने मजुरी काम करणारा नवनाथ घोगरे याचे आईकडे शरीर सुखाचे मागणी केलेली होती, तो प्रकार त्या महीलीने तीचा मुलगा अनिल जाधव यांस सांगितली होता. त्याचा राग मनात धरून यांतील मयत व्यक्ती मारुती साहेबराव रोमन यांस विश्वासात घेवुन त्यास गोड बोलुन त्या परीसरातील निर्जन स्थळी नेवुन त्याचे डोक्यात दगड घालुन त्याचा खून केलेला असल्याची व मयताची ओळख पटु नये म्हणुन त्याची कपडे काढुन गुन्हयाचा पुरावा नष्ट करणेचे उददेशाने ती पेटवुन दिली. तसेच त्याचे प्रेत काही कालावधी करीता त्याच परीसरातील ऊसाचे शेतात लपवुन ठेवले. नंतर रात्रीचे अंधारात त्या प्रेताचे मयताचे हात पाय बांधुन ते प्रेत पाण्याचे वर येवु नये म्हणुन साडीने सहाय्याने मोठ्या दगडांना बांधुन विहीरीत टाकुन दिलेले असल्याचे कबूली दिलेली आहे.
सदरची कामगिरी ही पंकज देशमुख (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, गणेश बिरादार, अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, अमोल खटावकर, तुषार भोर, सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय मोहीते, पोलीस हवालदार सादीक सय्यद, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, महीला पोलीस हवालदार रुपाली धिवार, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप, पोलीस कॉन्टेबल ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत, अमोल वाघमारे, अमोल कोकरे, विकास राखुंडे, जालींदर बंडगर, सागर पवार, महीला पोलीस कॉन्टेबल सुनिता पाटील यांनी केलेली आहे.