Khandala Breaking l लोखंडी पाईप व कुऱ्हाडीने मारहाण : लोणंद पोलिसात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
सुखेड ता खंडाळा येथून खंबाटकी साइट जवळील पठार वस्ती येथे रोडवर विजय संपत पडळकर व 29 वर्ष  रा सुखेड ता.खंडाळा यांना लोखंडी पाईपने व कुऱ्हाडीने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चैन व लहान मुलीच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची चैन काढून घेतल्याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की,रविवारी पाऊणे नऊ वाजता सुखेड ता खंडाळा येथून खंबाटकी साइट जवळील पठार वस्ती येथे रोडवरून विजय पडळकर त्यांची बलेरो कॅम्पर गाडी क्रमांक MH11DP9697 मधून जात असताना मागील भांडणाच्या कारणावरून संतोष रामचंद्र पडळकर, एकनाथ श्रीरंग पडळकर, विठ्ठल श्रीरंग पडळकर, तानाजी रामचंद्र पडळकर, तेजस एकनाथ पडळकर ,शिवाजी रामचंद्र पडळकर, अभिषेक तानाजी पडळकर ,शालन शिवाजी पडळकर, सुनीता विठ्ठल पडळकर ,सारिका एकनाथ पडळकर सर्व रा. सुखेड पडळकर वस्ती ता. खंडाळा  यांनी आपसात संगनमत करून हातातील लोखंडी पाईपने व कुऱ्हाडी ने मारहाण करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली व शिवीगाळ,दमदाटी केली आहे तसेच संतोष रामचंद्र पडळकर यांनी विजय पडळकर यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याची चैन काढून घेतले आहे व त्यांची लहान मुलगी तिच्या गळ्यातील सोन्याची अर्धा तोळ्याची चैन काढून घेतले आहे अशी फिर्याद विजय पडळकर यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार सोनवलकर हे करीत आहेत
To Top