Baramati News l राष्ट्रीय लोक न्यायालयात साडेपाच हजारावर खटले निकाली : साडेचार कोटी रकमेची वसुली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
शनिवारी दि. १० रोजी झालेल्या बारामती येथील राष्ट्रीय लोक अदालती मध्ये दाखल पूर्व व दाखल खटल्यामध्ये तडजोड होऊन ५६१५ खटले निकाली निघाले असून एकूण ४ कोटी ५८ लाख ५६ हजार ८२४ रुपयांची वसुली झाली.
            बारामती जिल्हा न्यायालयाचे मुख्य जिल्हा न्यायाधीश व्ही.सी.बर्डे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती विधी सेवा समिती व बारामती वकील संघटना अध्यक्ष ॲड प्रसाद खारतुडे व सदस्य वर्ग यांचे संयुक्त विद्यमाने हे लोकन्यायालय पार पडले. सदर लोकन्यायालयासाठी ६ पॅनल करणेत आले होते. जिल्हा न्यायाधीश १ श्री व्ही सी बर्डे.जिल्हा न्यायाधीश ३ श्री एच ए वाणी ,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आय ए आर मरछिया,द्वितीय सहा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री एन आर वानखेडे ,सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ओ एम माळी,दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती डी  पी पुजारी इत्यादी नी वकिलांसह पॅनल प्रमुख म्हणून काम केले.
           बारामती वकील संघटना अध्यक्ष ॲड प्रसाद खारतुडे, उपाध्यक्ष ॲड अनुप चौगुले,उपाध्यक्ष ॲड हर्षदा जगदाळे ,महिला प्रतिनिधी ॲड मोनिका कोठावळे ,ऍड श्वेता वणवे ,ऍड विजय कांबळे,ॲड बनसोडे यांचेसह वकील संघटनेचे सदस्य यावेळी हजर होते. विधी सेवा समिती चे समन्वयक म्हणून मिलिंद देऊळगावकर यांनी काम पाहिले.
            सदर लोकन्यायालयात बँकेच्या वसुलीचे ६२ खटले निकाली निघाले त्यात २ कोटी ४३ लाख ६५ हजार २६७ रुपयांची वसुली झाली.मोटार अपघाताच्या १० खटल्यामध्ये १ कोटी १७ लाख ७० हजार रुपये नुकसान भरपाई पक्षकारांना मिळाली.बाकी पाणी वसुली,महावितरण वसुली,महसूल वसुली असे एकूण ४ कोटी ५८ लाख ५६ हजार ८२४ रुपयांची वसुली झाली.
जास्तीत जास्त पक्षकारांनी तडजोडीमध्ये खटले मिटवल्यास पक्षकारांचा फक्त वेळच वाचत नाही तर लवकर तडजोड झाल्याने मानसिक त्रास देखील वाचतो असे मत बारामती चे मुख्य जिल्हा न्यायाधीश श्री व्ही सी बर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.
To Top