सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
संसाराचा गाडा हाकत असताना परिसरात घरगुती कामे केली. हाताला मिळल ते काम करत असताना प्रामाणिकता कायम बाळगली.आईने अनेक ठिकाणी काबाडकष्ट करून दोन लेकरांना उच्चशिक्षित केल.
शिक्षणासाठी प्राधान्य देऊन संगिता विलास खवळे या माऊलीने सासरी संसाराचागाडा चालवताना कौटुंबिक अडचणी आल्याने नंतर वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथे माहेरी कायमच्याच परतल्या त्यांनी माहेरी आल्यावर त्यांनी स्व कष्टाने घर उभारले कोणतेही काम करत असताना लहान मोठे याकडे न पहाता आपल्याला आयुष्यात आलेला संघर्ष आपल्या लेकरांना येऊन नये म्हणून मुलांना शिक्षणासाठी कमी पडू दिले नाही. खवळे यांनी मुलगी गौरी हिस पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिच्या पाठीशी राहून दहावर्षापूर्वी मुलीला पोलीस दलात जाण्यास पाठिंबा दिला.
पण आई कष्टाळू होती.तीने पोर पोलीस झालीय म्हणून कोणती लवलेशा न बाळगता तीचे कष्ट आणि दैनदिनी सुरूच ठेवली. आईची धडपड पाहून दोन्ही पोरांनी कष्टाचं चीज केल.एक मुलगी (गौरी) काही वर्षापूर्वीच पोलीस दलात भरती झाली.आता पोरगा साहेब झालाय.
ही गोष्ट आहे.वाघळवाडीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्ती मध्ये राहणाऱ्या संगिता विलास खवळे यांच्या मुलाची मुलगा विकी याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा (MFAS) मध्ये सहाय्यक संचालक पदी निवड झाली आहे. विकी याने वयाच्या २७ व्या वर्षी महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा या पदी गवसनी घातली आहे.सोमेश्वर विद्यालय, मु.सा.काकडे महाविद्यालय येथे बी कॉमचे उच्चशिक्षण पूर्ण करून पुण्यात २०१९ मध्ये स्पर्धा परीक्षेस सुरवात केली .स्वरूप वर्धनी येथे अभ्यास करत असताना २०२२ मध्ये अपयश आले.२०२३ मध्ये दिलेल्या परीक्षेत त्याला यश आले आणि महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा करिता दिलेल्या परीक्षेत निकालाच्या यादीत नाव आले.यामुळे परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
-----------------
आई आणि बहीण हे माझे प्रेरणास्थान आहेत.त्यानी मला कोणत्या गोष्ठीत कमी पडू दिल नाही.त्यांच्या पाठींब्यामुळे हे यश मिळवू शकलो.पुण्यात गेलो पण वायफळ वेळ कोठे घालवला नाही.आम्ही जो संघर्ष बघितलाय तो बदलायचा होता.-
विकी खवळे
---------------
कोणाकडे हात पसरले नाहीत.रोज लय ठिकाणी काम केली.लोकांनी पण साथ दिली.रोज पायी चालत माझ्या कामाच्या ठिकाणी जायची.पोर शिकवायची एवढच डोक्यात व्हत.पोरगी पोलीस झाली.आता पोराची चांगल्या पदावर नेमणूक झालीय.जे आजपर्यंत ज्यांच्यासाठी केल ते सार्थक झालय.मला जे पोरांच्याकडून हव होत ते सगळ मिळाल.लय आनंदी आहे.रोज राबली त्याच दोन्ही पोरांनी चीज केल.-
संगिता विलास खवळे