Bhor News l संतोष म्हस्के l किल्ले रायरेश्वराच्या पठारावर १५ जनावरांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला : तीन वर्षांच्या खोंडाचा फडशा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
किल्ले रायरेश्वरच्या पठारावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका खोंडाचा फडशा पडला आहे. शेतकऱ्याचे २० हजारांचे नुकसान झाले आहे. या भागात बिबट्याची दहशत कायम असते. 
            भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील रायरेश्वर ता.भोर पठारावर गायदरा येथील खाजगी रानात दहा ते पंधरा गाई तसेच खोंड यांचा कळप चरत असताना बुधवार दि.१४ सायंकाळच्या वेळी बिबट्याने गायींच्या कळपावर हल्ला केला.या हल्ल्यात बिबट्याने साडेतीन वर्षाच्या खोंडाचा फडशा पाडला. वनविभागाने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मात्र बिबट्याची दहशत कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे.या घटनेत शेतकरी सखाराम नामदेव जंगम यांचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
       रायरेश्वर किल्ल्यावर जंगल परिसर असल्याने जंगल भागात खाजगी रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन गेल्यानंतर जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे अनेकदा आढळून येते.बिबट्या बऱ्याच वेळा जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.मात्र जनावरांच्या मागे गुराखी असल्याने त्यातून जनावरे बचावली जातात. बिबट्याचे मागील एक महिन्यापूर्वी असाच गाईंचा कळप डोंगर भागातील खाजगी रानात चरत असताना बिबट्याने तीन वर्षांचा खोंड याच्यावर हल्ला करून गायब केल्याची घटना घडली होती.या घटनेत दहा हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सखाराम जंगम यांनी सांगितले.वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी रायरेश्वर किल्ल्यावरील नागरिकांकडून होत आहे.तर शेतकऱ्यांनी रायरेश्वर पठारावर जंगल परिसरात जनावरे चारताना काळजी घेवून सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजीराव यांनी केले.

                                     
Tags
To Top