Bhor News l भोरच्या चौपाटी नजीकच्या रस्त्यावर वाहनचालकांची कसरत : ठेकेदाराच्या संथगतीच्या कामामुळे वाहनचालकांना फटका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर- मांढरदेवी मार्गावरील भोर( चौपाटी) ते वाघजाईनगर रस्त्याचे नूतनीकरणाचे काम पावसाळ्याच्या तोंडावर संबंधित ठेकेदाराने सुरू करून रस्ता अनेक ठिकाणी उकरुन टाकला आहे.रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेकडो वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत असून हा त्रास सहन करावा लागत आहे.
           बसध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बोर चौपाटी नगरच्या उकरलेल्या रस्त्यावर पाण्याची तळी साचली आहेत.तर अरुंद रस्ता असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना तासन्तास वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.अनेकदा चारचाकी, दुचाकी वाहनांना मातीमय रस्त्यावरून जाताना अरुंद रस्त्यामुळे एकमेकांची वाहने घासत असल्याने वादाचे विषय होत आहेत. तर दुसरीकडे रस्त्यावरील चिखलामध्ये वाहने अडकण्याचे प्रकार घडू लागले आहे. उन्हाळ्यात ठेकेदारांनी झोपा काढल्या आणि आता पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. वाहने चालवताना मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. याची दखलही कोणी घेत नाही. तर संबंधित ठेकेदार सुस्तच असल्याचे संतप्त वाहनचालकांनी सांगितले.लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा भोर चौपाटीपासून वीसगाव खोरे तसेच मांढरदेवीला जाण्यासाठी तात्पुरता पर्यायी मार्ग सुशिक्षित करून द्यावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

तात्काळ खडीचे अस्तरीकरण 
सध्या अवकाळी पाऊस सुरू असून चौपाटी ते वाघजाई नगर रस्त्यावर चिखल झाला असल्याचे समोर येत आहे.वाहनचालकांना चिखलमय रस्त्यावरून वाहने चालवावी लागत असतानाच  वाहनचालकांना प्रवास करताना नाहक त्रास होऊ नये यासाठी तात्काळ वाहतुकीच्या पर्यायी रस्त्यावर खडीचे अस्तरीकरण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले.
Tags
To Top