Phaltan Breaking l अज्ञात वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू : लोणंद-फलटण रस्त्यावरील सुरवडी नजीकची घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
लोणंद-फलटण पालखी महामार्गावर काल रात्री वाहनाच्या धडकेत एका ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
         ही दुर्घटना सुरवडी गावाच्या हद्दीत, जगताप मळा या ठिकाणच्या  दि. २२ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास  घडली. जगताप वस्ती शेजारील ओढ्यावरील  पुलाजवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेवून खाजगी रुग्णवाहिकेतून  फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठवला.अपघाताचे नेमके कारण आणि मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.
To Top