सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असतानाच सावरदरे ता.भोर येथील परिसरातील रानात मेंढ्या चरत असताना विद्युत खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने तीन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दि. २२ घडली. शेतकरी खंडू लक्ष्मण मदने रा.वाल्हे, ता.पुरंदर असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान झाले.
सावरदरे गावच्या शिवारात जगन्नाथ सखाराम साळुंके यांच्या शेतात बकरी चारत असताना तेथील विद्युत खांबाजवळून बकरी जात होती.यावेळी विद्युत खांबामध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तीन बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.याबाबत सावरदरे गावचे गाव तलाठी परमेश्वर जाधव, कोतवाल बाबा भंडलकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पंचनामा तहसीलदार भोर यांना सादर केला आहे.