Baramati News l बारामतीत उद्या नाभिक समाजाचा वधू-वर मेळावा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होणार मार्गदर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दिपक जाधव
महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ यांच्या सूचनेनुसार शनिवार ( दि.२४ ) बारामतीत नाभिक समाजाच्या वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
          प्रमुख्य पाहुणे म्हणुन  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे उपस्थित राहणार आहेत. 
      बारामती तालुका नाभिक संघटना व बारामती तालुका नाभिक महामंडळ, श्री संत सेना नागरी पतसंस्था, कै. प्रदीप यादव व कै. शालन कृष्णाजी यादव ट्रस्ट व भाई कोतवाल हाउसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २४) बारामतीत कसबा येथे नाभिक समाजाचा मेळावा होणार आहे.
        कसबा येथील बारामती तालुका दूध संघ मंगल कार्यालयात सकाळी १० वाजेपासून मुला-मुलींची नाव नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दुपारी १२ वाजता वीर शिवाजी काशीद व वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची कार्यक्रमासह विविध कार्यक्रम, स्नेहभोजनचे आयोजन करण्यात आले आहे.
     या कार्यक्रमासाठी शहरातील सर्व नाभिक बंधूंनी शनिवारी आपली दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी पुणे जिल्हा तसेच बाहेरील मुलींसाठीही प्रवेश खुला असल्याचे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.
       .................................
To Top