Vaishnavi Hagawane Casel हगवणे बापलेकाच्या तळेगाव येथील हॉटेलमधून आवळल्या मुसक्या : हॉटेलमध्ये जेवताना जेरबंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात घडलेले एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यात वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) या तरुण विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र तुकाराम हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              या घटनेनंतर तब्बल सात दिवस फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा आणि वैष्णवी यांचा दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. ही दुर्दैवी घटना १६ मे रोजी वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने उघडकीस आली. वैष्णवीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच तिला सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.
        राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. शुक्रवारी ( दि.२३) पहाटे ४:३० वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवन करताना पोलिसानी अटक केली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवसांपासून कुठे लपून बसले होते, त्यांना अटक करण्यात आली आहे.
To Top