Indapur News l कौतुकास्पद...! वडील हॉटेल कामगार तर आई करते शेतात मोलमजुरी : मुलाने दहावीत ९६.४० टक्के गुण मिळवत केंद्रात पहिला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
वडील एका हॉटेलवर कामगार म्हणून काम करतात तर  आई दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरीचे काम करते. हे पाहून मुलाने जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपण दहावीच्या परीक्षेमध्ये नेत्र दीपक यश मिळवायचे असा ध्यास केला. व तो पूर्णही करून दाखविला. 
             इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संस्थेअंतर्गत डाळच क्रमांक दोन येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील विद्यार्थी रोहित राजू मद्री यांने दहावीच्या परीक्षेत 96.40% गुण प्राप्त करून विद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक तसेच कळस केंद्रांतर्गत प्रथम क्रमांक मिळवले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्याचे मुळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कानडी हे गाव आहे. वडील गेली बारा वर्ष इंदापूर तालुक्यात एका हॉटेलमध्ये चहा बनवण्याचे काम करतात. आई शेतामध्ये मजुरीचे काम करते. हे पाहून या विद्यार्थ्याने जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर नेत्र दीपक यश मिळवले. याबाबत आम्ही रोहित याच्याशी संवाद साधला असता त्याने सांगितले की, वडील हॉटेलवर काम करतात, आई शेतामध्ये मजुरीचे काम करते. त्यामुळे आगामी काळात इंजिनियर होऊन आई-वडिलांची इच्छा पूर्ण करणार आहे. जेणेकरून आई-वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व परिश्रम याची परतफेड करून त्यांना आगामी काळात आनंदमय जीवन जगण्याची शास्वती मी देत आहे. जेणेकरून आई-वडिलांना कुठेही कामाला जाण्याची गरज पडणार नाही. या यशामागे माझे शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक व आई-वडील यांचे मोलाचे योगदान आहे असेही त्याने आवर्जून सांगितले. वास्तविक पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील एक कुटुंब उदरनिर्वाहासाठी इंदापूर तालुक्यात आले होते. या ठिकाणी आल्यानंतर रोहित चे वडील राजू हे एका हॉटेलमध्ये कामाला राहिले. त्यानंतर त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी परिश्रम घेतले. त्या परिश्रमाचे चीज करून मुलाने सुद्धा गगन भारी येत दहावीच्या परीक्षेमध्ये नेत्र दीपक यश मिळवून आई-वडिलांची इच्छा पूर्ण केली. रोहित हा कळस केंद्रांतर्गत प्रथम आला आहे. या यशाबद्दल त्याचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे स्वीकृत सदस्य डी . एन. जगताप, विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव तसेच ज्या ठिकाणी त्याचे वडील हॉटेलमध्ये काम करतात ते हॉटेलचे मालक गोपाल शेठ तुपट यांनी त्याचे अभिनंदन केले. याबाबत आम्ही हॉटेल चालक गोपाल शेठ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्या हॉटेलमधील कामगाराच्या मुलाने मिळवलेले यश नक्कीच नेत्र दीपक आहे. आज आम्ही त्याचा सत्कार करणार आहे. तसेच आगामी काळातील त्याच्या शैक्षणिक खर्चासाठी मानधन स्वरूपात काही रक्कम देणार आहे. शेवटी एकच आहे इंजिनीयर बनून रोहित हा आई-वडिलांची इच्छा पूर्ण करणार आहे. एवढे मात्र नक्की आहे. गरीब कुटुंबातील एका विद्यार्थ्याने मिळवलेले दहावीच्या परीक्षेतील यश नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार हे मात्र तितकेच खरे आहे.
To Top