सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
राहता : सुखदेव साळवी
कोपरगाव तालुक्यातील वाणी वस्ती येथे साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाला आहे.
साहिल प्रशांत डोशी (वय १२), दिव्या प्रशांत डोशी (वय १५) अशी मृत्युमुखी पडलेल्या बहीण-भावाची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वाणीवस्ती येथे प्रशांत कन्हैयालाल डोशी हे पत्नी, एक मुलगा, दोन मुलींसह राहतात. वस्तीजवळील नवीन साठवण तलावात कालच निळवंडे धरणाच्या कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले होते. तलावात पाणी आल्याने आज दुपारी ही दोन्ही मुले पाण्यात गेली. पाण्यात खोल उतरल्यावर त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर काकडीचे पोलिस पाटील मधुकर गुंजाळ यांनी घटनेची खबर राहाता पोलिसांना दिली.