Dam update l निरा खोऱ्यात मुसळधार...! धरणांची पातळी वाढली : कालव्याचे आवर्तन बंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून निरा खोऱ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे निरा डावा कालव्याचे आवर्तन दि. २५ रोजी सकाळी ६ वाजता बंद करण्यात आले आहे. 
          निरा धरण साखळीतील भाटघर, वीर व  गुंजवली धरणांच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे.
भाटघर धरणक्षेत्रात १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ६.५० टक्के पाणीसाठा आहे. निरा देवघर धारणक्षेत्रात १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात सध्या १० टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. वीर धरणक्षेत्रात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात सद्या ३५.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गुंजवणी धारणक्षेत्रात ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात २०.५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 
Tags
To Top