सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुक्यातील सराटीमध्ये जगदाळे फार्मवर परवाना असलेलं पिस्तुल हलगर्जीपणाने हाताळल्याने त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झाला आहे.
24 मे रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील जगदाळे फार्म हाऊसवर ही घटना घडली. सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत. यानंतर इंदापूर पोलिसांनी आता चौघांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रदिप नानासाहेब जगदाळे, सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख, विजय शिवाजी पवार आणि राजकुमार दिलीपराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.