Javali News l सांगवी-कुडाळ रस्त्याच्या कामात प्रशासनातील अधिकारी व काही स्थानिकांकडून 'खो'घालण्याचा प्रयत्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : प्रतिनिधी
सांगवी-कुडाळ गावचा रस्ता गेली अनेक वर्षापासून काही ना काही कारणास्तव व रस्त्याच्या कामासाठी लागणारा निधी यामुळे प्रलंबित राहिला होता.याकरता गतवर्षी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अथक प्रयत्न करून हा रस्ता मंजूर करून घेतला आहे.
             या रस्त्यावरून हजारो शेतकरी,ग्रामस्थ, शाळकरी मुले दररोज ये-जा करत असतात.तसेच आजपर्यंत या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सर्वांनाच  समस्यांचा सामना करावा लागला आहे.काही दिवसांपासून सांगवी रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.हा रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा म्हणून कॉन्ट्रॅक्टर व सामाजिक हित जोपासणारे सामाजिक कार्यकर्ते हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे हा रस्ता मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत.मात्र असे असतानाही  काही समाजकंटक व स्थानिक प्रशासकीय अधिकारी संगणमत करून आर्थिक तडजोडी पूर्ण झाल्या नाहीत तर काम बंद कसे पडेल यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा जावली तालुक्यातील सांगवी पंचक्रोशीत सुरू आहे.
            या रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्यासाठी जो मुरूम लागतो तो आणण्यासाठी ठेकेदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.जर कोणी मुरूम टाकणारा तयार झाला तर त्याला प्रशासनाची प्रक्रिया पूर्ण करून हा मुरूम टाकावा लागतो.ती प्रक्रिया योग्यच असून जो-तो ठेकेदार पूर्ण करतो असतो.असे असताना देखील रस्त्याच्या कामात मुरुम टाकत असताना काही समाजकंटक ठेकेदारांना त्रास देण्याचे काम करत आहेत.हा रस्ता पूर्ण होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असताना काही समाजकंटक व स्थानिक प्रशासकीय अधिकारी एकमेकांशी संगणमत करून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले तरी चालेल परंतु आर्थिक देवाण-घेवाण करण्यात पुढे येऊ लागले आहेत.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित गाव पातळीवर असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासावेत.तसेच बेकायदेशीर मुरूम उत्खननाच्या नावाखाली ठेकेदाराला किती रुपयाची मागणी झाली आहे याची सत्यता पडताळावी अशी मागणी सांगवी ग्रामस्थ करू लागले आहेत.
         या कामाबाबत काही समाजकंटकांकडून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुढे घालून ठेकेदाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे जावली तालुक्याचे तहसीलदार यांनी रस्त्याची लोकांना असणारी गरज व प्रशासनावर वारंवार दबाव टाकणारे काही समाजकंटक यांच्याकडून ठेकेदारांना आर्थिक देवाण-घेवाणीची मागणी झाली आहे की नाही याची सखोल चौकशी करावी.यावर योग्य तो निर्णय प्रशासनाकडून घेण्यात यावी आणि सांगवी रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी येथील नागरिकांमधून होऊ लागली आहे. तसेच समाजकंटक व प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात सांगवी ग्रामस्थ आक्रमक झाले असून तहसीलदार यांनी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत 



अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या सांगवी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे परंतु काही समाजकंटक व स्थानिक प्रशासन अधिकारी रस्त्याच्या कामात 'खो'घालण्याचा प्रयत्न करत आहेत.यामुळे जावलीचे तहसीलदार यांनी योग्य ती भूमिका घ्यावी व रस्त्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक प्रशासन अधिकारी व समाजकंटकांना कायमचा धडा शिकवावा.
-------------------------
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे व बाबाराजे समर्थकांचे जावळीतील विकास कामांवर बारकाईने लक्ष आहे त्यामुळे बाबाराजे यांनी मंजूर केलेल्या कामावर कोणीही 'खो'घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.
मालोजीराव शिंदे
चेअरमन विकास सेवा सोसायटी कुडाळ
To Top