Jawali Breaking l तलावात गेलेला क्रिकेटचा चेंडू काढण्यासाठी गेलेल्या ९ वर्षाचा मुलाचा बुडून मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मेढा : प्रतिनिधी
क्रिकेट खेळत असताना कास तलावात गेलेला चेंडू काढताना पाय घसरून पाण्यात पडल्याने एका ९ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 
           राकेश कमल विश्वकर्मा (वय ९, रा. मोरे कॉलनी, मंगळवार तळे परिसर, सातारा, मूळ रा. नेपाळ), असे कास तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना दि. १७ रोजी सायंकाळी घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वकर्मा कुटुंबीय शनिवारी सायंकाळी कास तलावाजवळ फिरण्यासाठी गेले होते. तलावाशेजारी असलेल्या ब्रिटिशकालीन बंद बंगल्याशेजारी राकेश व अन्य मुले क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता चेंडू कास तलावात गेला. हा चेंडू आणण्यासाठी राकेश गेला असता तो पाय घसरून तलावात पडला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येण्यापूर्वीच तो तलावात दिसेनासा झाला. काही वेळानंतर या घटनेची माहिती मेढा पोलिस व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला देण्यात आली. सायंकाळी पाचच्या सुमारास रेस्क्यू टीमचे पथक तेथे पोहोचले. तलावात उतरून त्यांनी शोधमोहीम राबविली. बराचवेळ तलावात शोध घेतल्यानंतर रात्री आठच्या सुमारास राकेश याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. 
To Top