सुपे परगणा l जनाईने सोडलं... मात्र अवकाळीने तारलं...! वावरं तुडुंब...तहानलेल्या सुपेकरांवर अवकाळीची कृपा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
सुपे परगण्याला वरदान ठरलेल्या जनाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी दिर्घप्रतिक्षा करुनही काही गावांना मिळाले नाही. मात्र मागिल दहा दिवसापासुन सुरु असलेल्या अवकाळी पावसाने ऊस पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जनाईने सोडलं... अन पावसानं तारलं... अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 
       येथील पानसरेवाडी, काळखैरेवाडी आणि बाबुर्डी येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी जनाईच्या पाण्याची मागणी केली होती. मात्र जनाईचे पाणी एक महिना चालु असुनही या गावांना मिळाले नाही. त्यामुळे तीनही गावे जनाईच्या पाण्यापासुन वंचित राहिली होती. त्यामुळे या तीन गावातील सुमारे दोनशे एकर ऊस पिकाला फटका बसणार होता. मात्र त्यानंतर काही दिवसातच या गावांना अवकाळी पाऊस अगदी धावुन आला. मागिल दहा दिवसापासुन होत असलेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकाला खऱ्या अर्थाने जिवदान मिळाले आहे.  बाबुर्डी येथील लव्हे मळ्यात काल ( शुक्रवारी ) झालेल्या पावसाने शेतात पाणी पाणी झाले होते.
      जनाईचे पाणी बंद झाल्यावर आमच काय चुकलं, अशी बाबुर्डीकरांची आर्त हाक देत अजितदादांना प्रश्न केला होता. अखेर या भागाला वरुणराजाच धावुन आल्याने येथील ऊस पिके सद्या चांगलीच तरारली आहेत. त्यामुळे जनाईने सोडलं अनं पावसाने तारलं असेच म्हणावे लागेल. 
             ..............................
To Top