सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील पाबे येथील शेतकरी गणपत अनंता रेणुसे यांची मुलगी प्राजक्ता गणपत रेणुसे हिने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून 77.17 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे.वडील गणपत रेणुसे व आई मनिषा रेणुसे हे शेतकरी असून दिवसभर शेतात राबत आहेत. त्यांना पाच मुली असून सर्व मुलींना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांचे मार्गदर्शन, वेळेचे नियोजन, अभ्यासात सातत्य, नियमित सराव आई वडिलांचा आधार यामुळे मला यश मिळाले असल्याचे प्राजक्ता रेणुसे हिने यावेळी सांगितले. प्राचार्य डॉ संजीव लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग शिक्षिका वैष्णवी लिम्हण, पल्लवी लिम्हण, रीतीका भिकुले, राहुल पानसरे, प्रा. किरण जाधव प्रा . उपरे यांनी मार्गदर्शन केले.
तिच्या या यशा बद्दल आमदार शंकर मांडेकर यांनी तिचा सत्कार केला. यावेळी प्रांत अधिकारी महेश हरिश्चंद्र, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, आदीसह मान्यवर उपस्थित होते