सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
ग्रामपंचायतमध्ये केलेल्या कामाचे दीड लाखांचे बिल काढण्यासाठी ३० हजारांची लाच मागितली. त्यापैकी २५ हजार रुपये स्वीकारताना पळशी ता. बारामती येथील ग्रामपंचायतचा ग्रामसेवकाला लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले.
कांता बापूराव काळाणे (वय ५७) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. बुधवारी दि. ७ रोजी एसीबीकडून सापळा रचण्यात आला. पळशी गावचे हद्दीत एका रस्त्या नजीक तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये स्वीकारताना काळाने यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबी चे पोलीस निरीक्षक अमोल भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
तक्रारदार यांचे १६ लाख ४६ हजार कामाचे बिल मंजूर होण्याकरता काळाणे यांनी ठेकेदाराकडे बिलाच्या चार टक्के प्रमाणे ६० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या कामाच्या बिलाचा १४ लाख ९६ हजाराचा पहिला धनादेश देताना काळाने यांनी ६० हजार रुपयापैकी ३० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले होते. उर्वरित १ लाख ५० हजाराचे बिल काढण्यासाठी काळाने यांनी तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.