अभिमानास्पद..! बारामतीचा सुपुत्र पार पाडणार युरोप येथे होणाऱ्या २० व्या किनो फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकपदाची जबाबदारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी
 सायांबाचीवाडी ता. बारामती येथील युवा चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची युरोपमध्ये होणाऱ्या २० व्या किनो चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. 
            २० व्या किनो चित्रपट महोत्सवासाठी दिग्दर्शक अमोल भगत यांची एकमताने निवड करण्यात आली असून हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रपट महोत्सवास युरोप येथील मँचेस्टर शहराच्या ठिकाणी पार पडणार आहे. यासाठी चित्रपट महोत्सवाच्या परिक्षकपदी भारतातून भगत यांची निवड करण्यात आली असून ही बाब देशासाठी व महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. युरोप मधील फिल्ममेकर्स साठी गेली २० वर्षे हा महोत्सव होतं असून प्रथमच या मोह्त्सवात एका भारतीय युवा दिगदर्शकास परीक्षकपदी निवड केली आहे. अमोल भगत यांनी आजवर २३ देशांसाठी
६० चित्रपट मोह्त्सवास परीक्षक म्हणून जबाबदारी पार पडली आहे व भारत देशाचा तिरंगा उंचावला आहे. अमोल भगत बारामती मधील शेतकरी
कुटुंबमध्ये जन्मलेले असून कोणता हि पाठबळ नसून त्याचा हा प्रवास निश्चियतच पेरणादायी आहे. भारतातील अनेक तरुण चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देणारा आहे. त्याच्या यशामुळे नवोदित कलाकारांना त्यांची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. 
      यावेळी बोलताना भगत म्हणाले की, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरीचा भाग असणे ही एक महत्त्वाची जबाबदारी असते. यात चित्रपट आणि स्क्रिप्ट्सचे समीक्षक मूल्यांकन करणे, पात्र चित्रपटांची निवड करणे हे महत्वाचे काम असते. ज्युरी सदस्य म्हणून चित्रपट निर्मितीबद्दलची सखोल समज असणे आवश्यक असते. चित्रपट निर्मितीच्या दृष्टीकोनातून प्रत्येक कलाकृतीकडे पाहणे आवश्यक असते. त्यासाठी चित्रपटाचा ध्यास मनात असणे आवश्यक आहे. प्रथमच युरोप मधील मोह्त्सवासाठी काम पाहत आहे. यामधून युरोप मधील सिनेसृष्टीशी जोडल्याचा आनंद आहे व भारत देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळत आहे. ही बाब माझ्यासाठी अभिनास्पद आहे.
Tags
To Top