Malegaon Sugar Factory l २१ मे पासून माळेगाव कारखाना निवडणूक रणधुमाळी : 'या' दिवशी मतमोजणी व निकाल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 
          बुधवार दि. २१ मे ते  २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी प्रकाश अष्टेकर आणि माळेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २१ ते २७ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तसेच २८ मे रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. २९ मे ते १२ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. १३ जून रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाणार असून दि. २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. दि. २४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
To Top