Baramati News l माध्यमांनी दखल घेताच बारामती पोलीसांकडून तीन जण ताब्यात, दोन फरार : सोमेश्वरनगरच्या तरुणाला मारहाण प्रकरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
करंजेपूल अंतर्गत (ता. बारामती) शेंडकरवाडी येथील भरत तात्याबा शेंडकर (वय ३५) या ट्रॅक्टरमालक शेतकऱ्यास किरकोळ कारणावरून बारामतीमध्ये सहा जणांच्या टोळीने पाठलाग करत करत क्रूरपणे मारहाण केली होती. तरीही आरोपी वीस-बावीस दिवस फरार होते. माध्यमांनी याची दखल घेतल्यावर बारामती पोलिसांना जाग आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपीना अटक केली आहे. दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.
भरत शेंडकर हे लासुर्णेहून शेतकाम केल्यावर ट्रॅक्टर घेऊन परतत होते. दरम्यान रात्री आठच्या सुमारास बारामतीच्या मोतीबाग चौकात उभ्या असलेल्या युनिकॉर्न या चालकविरहित दुचाकीला ट्रॅक्टरमागे अडकवलेल्या अवजाराचा किरकोळ धक्का लागला. यावर दुचाकीचालक आदेश जाधव याच्यासह निक्सॉन (एमएच ४५ एएल ०२४२) गाडीतून आलेल्या आणखी पाचजण लोकानो  शेंडकर याना बेदम मारहाण केली होती. त्यातील आकाश बोराटे याने लोखंडी रॉडने गुडघ्याखाली घाव घातला. यानंतर शेंडकर जिवाच्या भितीने ट्रॅक्टरसह पळाले. मात्र त्यांचा पाठलाग करत करत माळेगाव येथील पेट्रोल पंपावर पुन्हा अडविले. तिथेही पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. 
याप्रकरणी बारामती पोलिसांनी 12 मे।रोजी आकाश शंकर बोराटे (रा. माळेगाव) यास अटक केली होती तो कोठडीतच आहे. आज रोजी आदेश बाळकृष्ण जाधव (रा. गुणवरे ता. फलटण), व सूरज शिंदे (रा. डोर्लेवाडी ता. बारामती) याना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता बारामती न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अशी माहिती बारामती पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान निखिल नंदकुमार घोरपडे (रा. पिंपळी ता. बारामती) व अनिल मेहेर (पत्ता माहिती नाही)  हे दोघे मात्र अजूनही फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. 
-------------------------
शेंडकर यांच्या नातेवाईकांनी वारंवार हेलपाटे मारूनही पोलिसांनी काहीही दखल घेतली नाही. शेंडकर यांना शस्त्रक्रिया करून घरी आणल्यावर त्यांची आई पार्वती शेंडकर यांनी शनिवारी आणि सोमवारी दोन वेळा बारामती शहर पोलिस ठाण्यासमोर धरणे धरले. वरिष्ठ कार्यालयात निवेदन दिले. तसेच माध्यमांनी हे प्रकरण लावून धरले. यामुळे पोलिसांना जाग आली आहे. बारामती पोलिसतील एकजण बुधवारी लाच घेताना लाचलुचपत खात्याने पकडला आहे. अशात पोलिसांचे शेतकऱ्याबाबतचे वर्तनही चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे वरीष्ठ कार्यालय यात आता तरी लक्ष घालणार का? असा सवाल उपस्थित होत आहे
To Top