Baramati News l दहावीच्या निकालात न्यु इंग्लिश स्कुल वाणेवाडीमध्ये मुलींचीच बाजी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे यांच्यावतीने मार्च 2024- 25 घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी विद्यालयातील निकालावरती मुलींनी आपला ठसा उमटवला आहे.      प्रथम तीनही क्रमांक मुलींचे आलेले आहेत. 
             प्रथम क्रमांक अंकिता प्रशांत भोसले 94 टक्के
द्वितीय क्रमांक वैष्णवी संतोष मोरे 93.80 टक्के
 तृतीय क्रमांक श्रेया संतोष सावंत 93.20 टक्के गुण मिळवून प्रथम तीनही क्रमांक मुलींनी मिळवले आहेत. विशेष बाब म्हणजे या तिन्ही विद्यार्थिनी गाईडराज्य पुरस्कार प्राप्त आहेत.विद्यालयाचा एकूण  निकाल 100 टक्के लागला असून एकूण 105 विद्यार्थ्यांपैकी 35 विद्यार्थी विशेष प्राविण्य, 44 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 26 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थी, मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक ,मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात आले.
Tags
To Top