सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
पुणे-पानशेत रस्त्यावर मणेरवाडी येथे भरधाव फॉर्च्यूनर कारने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला येत दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वकीलाचा मृत्यू झाला आहे.
अनिकेत अरुण भालेराव (३५, रा. वरदाडे, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे काका शांताराम गोपाळ भालेराव (५२) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, दुचाकीला उडवल्यानंतर फॉर्च्यूनर मधील चालक आणि एक युवती घटनास्थळावरून पसार झाले. हवेली पोलिसांनी याप्रकरणी फॉर्च्यूनर (एमएच १४ ई ए ००५१) च्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी (दि. १४) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पानशेत ते पुणे रोडवर मनेरवाडी येथे तारांगण हॉटेलसमोर घडली. शांताराम भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या अनिकेत भालेराव हे शिवाजीनगर न्यायालयात वकिली करत होते. बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ते भाजीपाला आणण्यासाठी खानापूर येथे गेले होते. साडेचारच्या सुमारास अनिकेत पानशेत ते पुणे रोडवरील तारांगण हॉटेलसमोरून जात असताना, समोरून भरधाव राँग साईडने आलेल्या फॉर्च्यूनरने त्यांना समोरून जोराची धडक दिली. यात अनिकेत गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, दोन्ही पायांच्या गुडघ्याला तसेच डाव्या हाताला मार लागला होता.