सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
ग्रामीण भागात कला जोपासली जाते पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही या चर्चेला छेद देतानाच ग्रामीण चित्रकार सौ. क्रांती टकले बनकर यांनी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सुदर्शन सभागृहात आयोजित केलेल्या श्वेत - अश्वेत या चित्रदर्शनाला कला प्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
चित्रकार क्रांती टकले बनकर यांनी सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर येथे श्री. हिंगणे सरांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेचे धडे गिरवले. शालेय जीवनातच चित्रकलेचा पाया रचल्यानंतर पुण्यामध्ये चित्रकलेचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काळ्या रंगांमध्ये स्वतःची चित्रशैली निर्माण केली.काळा रंग हा चित्रकलेतील एक अत्यंत गुढ,गहन आणि प्रभावी मानला जातो. काळा रंग चित्रातल्या प्रकाश छायेच्या खेळाला तीव्रता आणि गूढता देतो. काळा रंग सकारात्मकतेचेही दर्शन घडवतो तो स्थिरता, शक्ती आणि परिपूर्णतेचे देखील प्रतीक आहे. आशा काळ्या रंगाच्या छटेतील अनेक चित्रांचे प्रदर्शन श्वेत- अश्वेत नावाने आयोजित केले होते.
प्रदर्शनाला कलाप्रेमींबरोबरच अनेक नागरिकांनी भेट दिली. सिने कलाकार आस्ताद काळे यांचे वडील व ज्येष्ठ कलाकार श्री. प्रमोद काळे यांनीही चित्र खरेदी केले. श्री. प्रमोद काळे यांनी चित्रकार सौ.क्रांति टकले बनकर यांचे कौतुकही केले व प्रेरणा दिली. प्रदर्शन आयोजित करण्यामध्ये महाराष्ट्र कल्चरल सेंटर व पति अमित बनकर यांनी त्यांना सहकार्य केले.