सोमेश्वर रिपोर्टर टीम------
उंब्रज : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी पुणे-बेंगळुरु महामार्गावर उंब्रज-भोसलेवाडी येथे रस्त्यावर पाणी साचल्याने एक तास महामार्गावरील वाहतूक बंद पडली. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले होते.
पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाडी गावाच्या हद्दीत महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्यावरुन पावसाचे पाणी बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने महामार्गावर पाणी साचले. त्यामुळे एक तास महामार्गावरील वाहतूक बंद पडली. रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होताच महामार्गाची यंत्रणा खडबडून जागी झाली. पावसातच मजुरांनी शक्य होईल तसे रस्त्यावरील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
झाल्याने महामार्गावर पाणी साचले. त्यामुळे एक तास महामार्गावरील वाहतूक बंद पडली. रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होताच महामार्गाची यंत्रणा खडबडून जागी झाली. पावसातच मजुरांनी शक्य होईल तसे रस्त्यावरील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान साचलेल्या पाण्यातूनच वाहतूक सुरु होती. उंब्रज बाजूला वाहनाची रांग लागली होती. यातच एक वाहन महामार्गावर बंद पडले त्यामुळे वाहतूक बंद पडली. हे वाहन बाजूला काढून पुन्हा वाहतूक सुरू करण्यासाठी सुमारे एक तास गेला. वाहतुकीची कोंडींमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते.