Pune News l पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मोहन कोलते तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत भिसे यांची बिनविरोध निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा कार्यक्षेत्र असलेली जिल्ह्यातील एक अग्रगण्य पतसंस्था पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मोहन गेनबा कोलते पिसर्वे (ता.पुरंदर )व व्हाईस चेअरमनपदी  चंद्रकांत दत्तात्रय भिसे (ता.इंदापूरर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन दिनेश दुधाळ व व्हाईस चेअरमन मोहन कोलते यांना नेमून दिलेला कार्यकाल संपल्यामुळे राजीनामा दिला होता. रिक्त जागी ह्या निवडी करण्यात आल्या.
    निवडणूक निर्णय अधिकारी संतोष तळपे यांनी या निवडी जाहीर केल्या. चेअरमन,व्हाईस चेअरमन निवड प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार महादेव माळवदकर पाटील, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील वाघ, सरचिटणीस संदिपआप्पा जगताप, कोषाध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनीलतात्या कुंजीर,  शिक्षकनेते राजूभाई आत्तार , संदीप कुंभार, प्रकाश जगताप, रामदास कुंजीर, दादासाहेब दरेकर ,विकास लवांडे,श्रीकृष्ण उत्पात , नेते हरिदासआप्पा दळवी आदी उपस्थित होते.
         यावेळी निवडप्रसंगी पुणे जिल्हा  शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे  संचालक दिनेश दुधाळ, संदीप रसाळ, दिलीप खुडे, सचिन गायकवाड, प्रताप शिरसट,आप्पासाहेब मेंगावडे, , भरत गावडे ,सचिव शहाजी पोफळे, सहसचिव नितीन सलगरे, लेखनिक शुभम मस्तूद आदी उपस्थित होते.
     चेअरमन पिसर्वे (ता. पुरंदर) येथील रहिवासी असून ते सध्या नांदूर (ता. दौंड) प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. व्हाईस चेअरमन चंद्रकांत भिसे हे काटेवाडी (ता. बारामती) गावचे रहिवासी असून ते सध्या धवलपुरी (ता. इंदापूर )येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
           निवडीनंतर चेअरमन मोहन कोलते व व्हाईस चेअरमन चंद्रकांत भिसे यांनी पुणे जिल्हा शिक्षक समितीची पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा वैभवशाली वारसा पुढे चालू ठेवून पारदर्शक व काटकसरीचा कारभार करून सर्व सभासदांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी शिक्षक समितीच्या वरिष्ठ  पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
To Top