सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात उ.बा.ठा.गटाला खिंडार पडले असून दोन महत्त्वाच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश झाला.भोर-राजगड-मुळशी परिसरातील भाजपाचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी आढावा बैठक श्री छत्रपती शिवाजीराजे इंजिनिअरिंग कॉलेज, धांगवडी (ता. भोर) येथे पार पडली.
या बैठकीत माजी आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब गरुड प्रमुख उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख हनुमंत कंक, सॉलिसिटर प्रसाद शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या बैठकीत माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर देत, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीतीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य जीवन कोंडे, भोर तालुका उत्तर विभाग अध्यक्ष संतोष धावले, तालुकाध्यक्ष रविंद्र धोंडिबा कंक, राजूभाऊ रेणुसे,समीर मारणे,शैलेश सोनवणे,विठ्ठल आवाळे,पुणे जिल्हा सरचिटणीस भाजपा सचिन मांडके, पंकज खुर्द, ॲड.कपिल दुसंगे,रमेश बुदगुडे,उत्तम थोपटे,समीर घोडेकर,अमर बुदगुडे,संपत दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.