Baramati News l बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी ताराचंद शेंडकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ,मुख्य शाखा सोमेश्वरनगर च्या अध्यक्ष पदी ताराचंद मोतीराम शेंडकर यांची निवड करणेत आली. माजी अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांचे सव्वा महिन्यापूर्वी अचानक हृदयविकाराने निधन झाल्याने नवीन  कार्यकारीणी निवडण्यात आली.
       ऑन ड्यूटी व निवृत्त सैनिकांसाठी कार्य करीत असताना सामाजिक कार्यात शेवटच्या घटकापर्यंत कामात अग्रेसर असणाऱ्या या आजी माजी सैनिक संघटनेची बैठक  करंजेपुल येथील कार्यालयात संघटनेचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय धावपटू जगन्नाथ लकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी अध्यक्षपदी निवृत्त सुभेदार मेजर ताराचंद शेंडकर यांची सर्वसंमतीने बिनविरोध निवड करणेत आली.
   सुभेदार मेजर ताराचंद शेंडकर यांनी काश्मीर,आसाम ,लेह, इत्यादी भागात सेना दलात ई. एम. ई विभागात  सलग ३० वर्ष सेवा केली आहे. आज झालेल्या कार्यकारीणी निवडीत अध्यक्ष पदी ताराचंद शेंडकर,तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष पदी ॲड.गणेश आळंदीकर यांची, उपाध्यक्ष पदी भगवान माळशिकारे,रामचंद्र शेलार, सचिव पदी रामदास कारंडे,सहसचिव पदी विजय साबळे,खजिनदार पदी राजेंद्र पवार,सहखजीनदार पदी किरण सोरटे,कार्याध्यक्षपदी बाळासाहेब गायकवाड,नितीन शेंडकर,ज्येष्ठ सल्लागार पदी राजाराम शेंडकर व मोहन शेंडकर ई.ची निवड करणेत आली.
        सैनिक संघटना तक्रार निवारण कमिटी द्वारे आत्तापर्यंत सुमारे १६७ वाद न्यायालय व पोलिस स्टेशन ला न जाता मिटवण्यात आले आहेत. तसेच कोरोना ग्रस्तांना,पूरग्रस्तांना मदत,रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी शिबिरे, दवाखान्यासाठी गोरगरीब व गरजूंना लाखोंची मदत वर्गणी काढून करणेत आली आहे. या शिवाय राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा अनेक वर्ष घेण्यात आल्या. पिढ्यान पिढ्या न सुटलेले शेतीच्या व घरांच्या रस्त्याचे वाद मिटविले गेले. महाबळेश्वर जवळील गावात दरड कोसळून तीन गावांचे मोठे नुकसान झाले यांना मदत करून त्यांच्या पुनर्वसनात मोठे योगदान संघटनेने दिले आहे.
        संस्थापक जगन्नाथ लकडे यांनी संघटनेच्या कार्यात खंड पडू न देता अखंड समाजसेवा चालू ठेवावी असे आवाहन केले. ॲड गणेश आळंदीकर यांनी तक्रार निवारण कमिटीद्वारे मोफत अवघड वाद मिटवल्याची  माहिती दिली.सचिव रामदास कारंडे यांनी प्रास्ताविक मधे संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. तर उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यांनी आभार मानले.सदर बैठकीला सर्व पदाधिकारी व  दत्तात्रय चोरगे, मीनानाथ होळकर,संजय चव्हाण ,युवराज चव्हाण,भरत मदने ई सदस्य हजर होते.
To Top