सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणामध्ये विकासकामांच्या धडाक्याने संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध असलेले संपूर्ण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जातीपातीच्या वरचे विकासाचे राजकारण आपण सगळेच जाणतो. अशा या नेत्याची धास्ती घेऊन राज्यातील दिग्गज नेत्याने काही पाळीव कार्यकर्ते भुंकण्यासाठी ठेवले आहेत. लक्ष्मण हाके त्यापैकीच एक आहेत. त्यांना वेळीच आवरा चोख प्रतिउत्तर देण्याचा इशारा बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी दिला आहे.
प्राध्यापक असणं हा ज्ञानी लोकांचा प्रांत ओळखला जात असला तरी आता तो जाती द्वेष पसरवणाऱ्या लाचार लक्ष्मण हाकेमुळे डागाळला गेला आहे. २०१४ ला धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेतून सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या पक्षाला अजून एकदाही धनगर आरक्षण प्रश्नाबद्दल जाब न विचारता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी हे कोणत्याच जातीच्या आरक्षणाला विरोध करणारे नाहीत हे माहिती असताना देखील त्यांची बदनामी करण्याचे जे केविलवाणे प्रयत्न आणि असंस्कृतपानाचे प्रदर्शन हाके करत आहेत ते केवळ जातीच्या उद्धारासाठी नसून स्वतः साठी आहे, स्वतःला महागड्या गाड्या मिळवण्यासाठी आहे हे आमचे धनगर बांधव जाणतात. त्यांचे हे वक्तव्य आणि प्रयत्न ओबीसींच्या हितासाठी नसून महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला तडा घालवणारे व जाती जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत.
राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता विटेच उत्तर दगडाने देण्याची ताकद बाळगतो पण सुसंस्कृत राजकारणाचे दादांचे संस्कार असल्यामुळे प्रत्युत्तर देत नसला तरी सुद्धा माझं हाकेंना सांगण आहे की संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांनी दादांची जाहीर माफी मागावी आणि त्यांच्या वरिष्ठांनीसुद्धा असले पाळीव कार्यकर्ते बांधून ठेवावेत. जर असल्यांनी पुन्हा दादांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. असे ऋषिकेश गायकवाड यांनी म्हणटले आहे.