सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर एज्युकेशन सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी जेष्ठ कायदा तज्ञ ॲड.मुकुंद तांबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर वकील संघटनेकडून ॲड.मदनमोहन ठाकूर,सरकारी वकील चंद्रकिरण साळवी तसेच विजय मुकादम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी ॲड.के.के.बांदल,दीपक बोरकर,अजिंक्य मुकादम,नाना बांदल,माजी उपनगराध्यक्ष उमेश देशमुख,ग्राहक पं.संघटक अनिल गिरे उपस्थित होते.
सत्काराका उत्तर देताना ॲड.तांबेकर म्हणाले भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयाने नुकताच शताब्धी महोत्सव साजरा केला आहे.तर पुणे जिल्ह्यात नंबर एकची शाळा हा बहुमान मिळवला आहे.तरी पुढील काळात अध्यक्ष प्रमोद गुजर,सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर तसेच सर्व संचालक मंडळ विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सचोटीने प्रयत्न करणार आहोत.