Murud Breaking l बाबुराव गोळे l काशिद समुद्रात पुण्याचा २० वर्षीय तरुण बुडाला : तब्बल ४२ तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मुरुड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील जगप्रसिद्ध काशीद समुद्रकिनाऱ्यावर पुण्यातील तनिष्क मल्होत्रा (वय २०) हा युवक बुडून बेपत्ता झाला होता. तो आणि त्याचे तीन मित्र पर्यटनासाठी १ जुलै रोजी काशीदला आले होते. समुद्रस्नान करताना तनिष्क खोल पाण्यात गेला आणि लाटांमुळे वाहून गेला. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याचे मित्र मात्र सुखरूप वाचले.
           बुडालेल्या तनिष्कचा मृतदेह तब्बल ४२ तासांच्या अथक शोधानंतर ३ जुलै रोजी सकाळी ७.४५ वाजता हेलिकॉप्टर व अ‍ॅडव्हान्स थर्मल ड्रोनच्या साह्याने सापडला. तटरक्षक दल, एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम, लाईफ गार्ड, स्थानिक नागरिक आणि मुरुड पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे शोधकार्य यशस्वी झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.
पावसाळी हंगामात समुद्रात उतरणे जीवावर बेतू शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. काशीद किनारा सध्या बंद असतानाही काही पर्यटक धोका पत्करून समुद्रात जात आहेत. या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावर एक स्पीड बोट तैनात करण्याची मागणी पर्यटकांकडून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे केली जात आहे.
Tags
To Top