Bhor News l चरण्यासाठी गेलेल्या जनावरांना कालव्यावर तुटून पडलेल्या विद्युत तारांचा धक्का : दोन म्हशींचा मृत्यू , शेतकरी व इतर जनावरे बचावली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
आंबवडे खोऱ्यातील नाटंबी ता.भोर येथील शेतकरी प्रकाश बाळू खोपडे रा.नाटंबी यांच्या २ गाभण म्हशींना कॅनॉल रोडवरून चारायला घेऊन जाताना रस्त्यावर तुटून पडलेल्या वीजवाहक तारांचा जोरदार धक्का बसला.या घटनेत २ म्हशींचा मृत्यू झाला असून शेतकऱ्याचे २ लाखांचे नुकसान झाले आहे.
          स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी प्रकाश खोपडे यांचा मुलगा नेहमीप्रमाणे आठ जनावरे रोहीडेश्वर हायस्कूल जवळील कॅनॉल रोडने खाजगी रानात चारण्यासाठी घेऊन जात होता.यावेळी महावितरणच्या विद्युत वाहक खांबावरील तार तुटून रस्त्यात पडली होती.ही वीज वाहक तार चरायला जाणाऱ्या दोन म्हशींना चिकटली.दोन्ही म्हशींचा जागेवरच मृत्यू झाला.हे पाहताच शेतकऱ्याने सावधानता राखीत इतर दोन म्हशी व चार रेडके दुसरीकडे वळवली.यामुळे या घटनेतून बचावले.६ जनावरे व शेतकरी बचावले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.त्याबरोबरच भोर पोलीस स्टेशन, महावितरण तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महावितरणकडून तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली.

शेतकऱ्याला लवकरच भरपाई देण्यासाठी प्रयत्न
     महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.शेतकऱ्याने योग्य ती कागदपत्रे महावितरणच्या कार्यालयाकडे जमा करण्याचे सूचना देण्यात आले आहेत.शेतकऱ्यावर ओढवलेल्या घटनेचा पंचनामा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल.लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे महावितरण उपकार्यकारी अभियंता भोर उपविभाग अविनाश वाघमारे यांनी सांगितले.
                                  
To Top