Bhor News l जांभळीतील जळीतग्रस्तांच्या मदतीसाठी माजी आमदाराच्या मुलाचा पुढाकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील जांभळी ता.भोर येथे गुरुवार दि. ३ जुलै पहाटेच्या दरम्यान दत्तात्रय कोंडीबा भोरडे (वय ७५ वर्ष) यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली.
या आगीत संपूर्ण घरासह घरातील धान्य, कपडे, जनावरांची चारा, रोख रक्कम व इतर वस्तू जळून खाक झाल्या होत्या.याची दखल घेऊन माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या वतीने युवानेते पृथ्वीराज संग्राम थोपटे यांनी १० हजार, घर किराणा व घर बांधणीसाठी लागणारा खर्च, पंचायत समितीचे माजी सभापती लहूनाना शेलार यांसकडून शैक्षणिक साहित्य व बंटी कोंडे यांनी १० हजार रोख रक्कम देवून जळीतग्रस्तांना मदत केली.
      जळीतग्रस्ताला आर्थिक मदत मिळाल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून आभार मानण्यात आले.
Tags
To Top