Big Breaking l उपमुख्यमंत्री अजित पवारांची सात दिवसात माफी मागा ...अन्यथा न्यायालयत खेचणार : बारामतीच्या कार्यकर्त्याची प्रा. हाके यांना कायदेशीर नोटीस

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : महेश जगताप
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमी हेतुपूरस्कर बेताल वक्तव्य करणाऱ्या व त्यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या प्रा.लक्ष्मण हाके याच्या विरोधात सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते  नितीन संजय यादव यांनी कायदेशीर नोटीस बजावली असुन सात दिवसात हाके यांनी अजित पवार यांची लेखी माफी न मागितल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.
           उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात वेळोवेळी जाणुनबूजुन बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधात कायदेतज्ञ ॲड.शंतनु माळशिकारे यांच्या मार्फत 
नितीन संजय यादव यांनी लक्ष्मण हाके यास आज दि. ६ जुलै रोजी नोटीस बजावली असुन लक्ष्मण हाके यांनी सात दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लेखी माफी न मागितल्यास लक्ष्मण हाके यांना न्यायालयात खेचून दिवाणी, फौजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नितीन यादव यांनी सांगितले.  
To Top