सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील नेरे ता.भोर येथील गणपत सावले यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून चांदी लॅपटॉप तसेच रोकड लांबवली.या घटनेत ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समोर आले आहे.घटनेची फिर्याद सुरज संपत सावले यांनी दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज सावले यांचे २९ जून पासून शुक्रवार दि.४ जुलै बंदघर होते. या काळात चोरट्यांनी घरावरची दोन ठिकाणची कौले काढून रात्रीच्या वेळी चोरी केली. ही बाब सुरज सावले यांना पुणेहून गावाकडे आल्यानंतर लक्षात आली. सुरज यांनी घरातील कपाट उघडे दिसल्याचे लक्षात आल्यानंतर पाहिले असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.कपाटात असणाऱ्या वस्तू वस्तू शोधल्या असता चोरी झाल्याचे समोर आले. चोरीत चांदी - ७ हजार,रोख रक्कम १० हजार तर २० हजारांचा लॅपटॉप चोरट्यांनी कपाट फोडून लंपास केला.या घटनेत सावले यांचे ३७ आजारांचे नुकसान झाले.पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एस.जी.कुंभार करीत आहेत.
-------------------
पोलिसांनी ग्रामीण भागात रात्रगस्त वाढवावी
सध्या पावसाळा सुरू असून ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर येत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी ग्रामीण भागात पोलिसांची रात्रगस्त सुरू होती.सध्या पोलिसांची रात्रगस्त नसल्याचे दिसून येत आहे.चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.