सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
मोठ्या घराण्यात जन्माला येवून आयुष्यभर गोरगरिब लोकांना आधार देत त्यांच्या जीवनात आनंद फुलविला .अन्यायाविरुद्ध संघर्ष करत सर्वसामान्य माणसांमध्ये सात्विक उर्जा निर्माण करण्याचे काम माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री दादा जाधवराव यांनी केले असे प्रतिपादन पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी केले.
भिवरी (ता. पुरंदर) येथील श्री कानिफनाथ विद्यालयात लोकनेते दादा जाधवराव यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त श्री गणेश अपंग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुलाबराव घिसरे यांच्या माध्यमातून गरीब होतकरू मुलांना शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी गंगाराम जगदाळे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिवरी गावच्या सरपंच मोनाली राहुल कटके होत्या. याप्रसंगी समाजसेवी व्यक्तिमत्व माऊलीदादा घारे, भाजपा पश्चिम पुरंदर अध्यक्ष संदीप कटके, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीप कटके, माजी सरपंच विशाल कटके, भैरवनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष सखाराम कटके, श्रीनाथ गोसावी बुवा तरूण मंडळाचे अध्यक्ष सागर कटके, पोलीस पाटील सचिन दळवी, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हस्कू कटके, भैरवनाथ सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष सोपान कुंजीर, उपाध्यक्ष म्हस्कू दळवी, श्रीनाथ गोसावी तरूण मंडळाचे माजी अध्यक्ष शेखर रामदास कटके, माजी उपसरपंच तुकाराम ए. कटके, माजी उपसरपंच रघुनाथ ढवळे, भिवरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक किरण कटके, मनोहर घिसरे, हनुमंत साळुंखे, संभाजी घिसरे, प्रमोद कटके, नेताजी कटके, उत्तम कटके, बाळासाहेब नाटकर, नवनाथ भिसे, कानिफनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय गुरव आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षकवृंद आणि भिवरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
गेली २६ वर्ष हा उपक्रम गुलाबराव घिसरे व त्यांच्या गणेश अपंग विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गुरव यांनी केले. सूत्रसंचालन मोहिनी लोणकर यांनी केले.तर आभार गुलाब आप्पा घिसरे यांनी मानले.