Khandala Breaking l चोरडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीच्या मालकाची ७० लाखांची फसवणूक : शिरवळ पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी 
खंडाळा तालुक्यातील नायगाव गावच्या हद्दीमध्ये असणा-या जमिनीचा नोंदणीकृत साठेखत असताना व नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र असताना जमीन व्यवहाराच्या जागेची मोठी रक्कम मागण्याच्या हेतूने न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही विश्वासघात करीत जमिनीचे खरेदीखत करीत सांगवी-नायगाव-धनगरवाडी येथील चोरडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीच्या मालकांची फसवणूक व विश्वासघात करीत तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी कर्मचा-यासहित चौघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. नायगाव ता.खंडाळा येथील गट नंबर १०४४ मधील ८५ आर जमिनीचा नोंदणीकृत साठेखत व शासकीय परवानग्या मिळणेकामी नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र जमिनीचे मालक पारुबाई तुकाराम नेवसे,अलका दत्तात्रय नेवसे,सारिका उर्फ देवरानी नितीन नेवसे,शुभांगी संतोष रगाडे यांनी चोरडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीच्या मालक यांना १२ जुलै २०१२ रोजी करून दिलेले आहे.या अधिकारान्वये चोरडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीच्या मालक यांनी व्यवहारापोटी ४२ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते.त्यानंतर पारुबाई नेवसे यांच्याविरुद्ध शिधु नेवसे यांनी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करीत न्यायालयाचा मनाई आदेश प्राप्त केला आहे.सदरील दावा न्यायालयामध्ये आजही प्रलंबित आहे.यावेळी चोरडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीच्या मालकांनी नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्राच्या आधारे सर्व शासकीय परवानग्या शासकीय नजराणा भरून प्राप्त करित सदर गटामधील हिस्सा एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामध्ये शासकीय रक्कम भरून उद्योग मंत्रालय महाराष्ट्र राज्य कडून समाविष्ट करीत त्याची अधिसूचना देखील घोषित झालेली आहे.दरम्यान,न्यायालयाचा मनाई आदेश पारित झाल्यानंतरही संबंधितांनी चोरडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीच्या मालकांना कौटुंबिक अडचणी सांगत चेकद्वारे व्यवहारापोटी रकमा स्विकारल्या आहे.यादरम्यान,शिधु नेवसे यांच्याशी चर्चा करून सहमतीने चोरडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपी यांनी तहसीलदार खंडाळा यांच्याकडून व्यवहार करण्याकामी सातबारा खुले कारणेबाबतचा आदेश प्राप्त केला आहे.यावेळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी पंकज मोहन वीर (रा.सांगवी ता.खंडाळा)संगनमत करून अलका दत्तात्रय नेवसे,सारिका उर्फ देवराणी नितीन नेवसे (दोघी रा.नायगाव ता.खंडाळा) व शुभांगी संतोष रगाडे(रा.वाठार कॉलनी ता.खंडाळा)यांनी चोरडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीच्या मालकांची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे नायगाव ता.खंडाळा येथील गट नंबर १०४४ मधील ८५ आर जमिनीचा नोंदणीकृत खरेदी दस्त २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पंकज वीर यांना विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे.यानुसार चोरडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीच्या मालकांची जमीन व्यवहारापोटी तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी पंकज वीर याच्यासह अलका नेवसे,सारिका उर्फ देवराणी नेवसे,शुभांगी रगाडे यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची चोरडिया इंडस्ट्रियल पार्क एलएलपीचे प्राधिकृत अधिकारी समीर कुलकर्णी यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे हे करीत आहे. 
To Top