सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
शाळेचे व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात करिअरसाठी जातात. शालेय जीवनात एकत्र भेटलेले विद्यार्थी कधी भविष्यकाळात भेटतील याची शाश्वती नसते. परंतु पुरंदर तालुक्यातील पुरंदर ज्युनिअर कॉलेज येथे १९९२ ते ९४ साली ११ वी ते १२ वी वाणिज्य शाखेमध्ये शिकलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी तब्बल ३० वर्षांनी एकत्र येत स्नेह मेळावा साजरा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याकाळी शिकवलेल्या गुरुजनांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सकाळी पुरंदर जूनियर कॉलेजमध्ये एकत्रित जमून त्या काळात घालवलेल्या सुखद क्षणांच्या आठवणी जाग्या केल्या.यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षण व शिक्षकांप्रती भावना व्यक्त करून शालेय आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उर्वरित जीवन सुखकर कसे जगावे याचे मोलाचे मार्गदर्शन केले.
माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याला त्यावेळेसचे शिक्षक इंदूमती सांगळे, लक्ष्मण सांगळे, व्ही. आर. गवते, सुनंद सूर्यवंशी, मिसेस सूर्यवंशी आणि पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विद्यमान प्राचार्य इस्माईल सय्यद उपस्थित होते.
यावेळी पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य विभागात सन १९९२ ते ९४ साली शिक्षण घेतलेले दीपक खळदे, भरत पोमण, संतोष गिरमे ,रामदास काळे, चंद्रकांत काळे, शशिकांत मारणे, राजेंद्र दरेकर, आप्पासाहेब काळे, संदीप दरेकर, पंढरीनाथ काळे, गोकुळ क्षीरसागर, शिवाजी पवार, प्रमिला जमदाडे, सुनीता ल.झेंडे, सुनीता मा. झेंडे, रेखा झेंडे, मंगल झेंडे, कल्पना चावीर, जयश्री लिंभोरे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना एक प्रेमाची भेट म्हणून समई, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सर्वांनी मिळून सन्मान केला.
यावेळी पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या 92 ते 94 च्या संपूर्ण बॅचने पुरंदर हायस्कूलला थोड्याच दिवसांमध्ये एक डिजिटल क्लासरुम देण्याचे जाहीर केले आहे.
ज्या क्लासमध्ये यांनी सर्वांनी शिक्षण घेतले तोच क्लास हा डिजिटल क्लासरूम म्हणून केला जाईल असे प्राचार्य सय्यद सर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष गिरमे यांनी केले. सूत्रसंचालन संगिता आचरेकर ,मंगल झेंडे यांनी केले.आभार पंढरीनाथ काळे यांनी मानले.