सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील भाजपच्या बारामती पुर्व मंडलच्या अध्यक्षपदी पोपटराव गणपतराव खैरे यांची निवड करण्यात आली.
यासंदर्भातील पुणे जिल्हा ग्रामिणचे ( दक्षिण ) जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी नुकतेच खैरे यांना पत्र दिले आहे. पक्षाचे काम निष्ठेने केल्याची दखल घेवुन प्रदेशाध्यक्ष यांच्या सुचनेनुसार खैरे यांची नियुक्ती केली आहे. भाजपा पुणे जिल्हा ग्रामीणच्या ( दक्षिण ) कार्यकारणीत त्यांची नियुक्ती केली असल्याचे वढणे यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्या सरकारच्या माध्यमातुन शासनाची योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष पोपट खैरे यांनी दिली.
.....................................