सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील चोरीचे सत्र सुरु असताना कुडाळ विभागानंतर आता मेढा विभागाकडे घरफोडीचे प्रमाण वाढले असून रिटकवली गावामध्ये तीन ठिकाणी घरफोडी झाली आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्यां सह पैशावर ही चोरांनी (दि. १० ) रोजी रात्री डल्ला मारला असल्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली असून साधारण एक लाख छप्पन्न हजार चारशे रुपयाची मालमत्ता व रोखड असल्याचे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे.
याबाबत दिलेल्या माहितीनुसार अनुक्रमे रिटकवली शेखर श्रीकांत दळवी , अरुण वसंत दळवी, अरविंद सुरेश मर्ढेकर, शंकर बाबुराव मर्ढेकर यांचे बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरी झाली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
यामध्ये शेखर श्रीकांत दळवी यांचे घरातील पस्तीस हजार रुपये रोख आणि चारशे रुपये किमतीचे लहान मुलांचे बारशात मिळालेले पायातील अंदाजे ४ ग्रॅम वजन चांदीचे दोन पट्ट्याचे जोड जु.वा.कि.अ. तसेच अरूण वसंत दळवी यांचे घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम आणि अट्टेचाळीस रुपये किमतीची एक अंदाजे १२ ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन जु.वा.कि. अ. तसेच अरविंद सुरेश मर्ढेकर यांचे घरातील तीस रुपये आणि छत्तीस रू. किमतीचे अंदाजे ४ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी सोन्याचे तीन मनी बारशामध्ये मिळालेले लहान मुलांच्या ६ , अंगठी , ३ बदाम त्याचे एकुण वजन अंदाजे ५ ग्रॅम असलेले असे एकूण ९ ग्रॅम वजनाचे जू .वा.की.अं दोन हजार रूपये किमतीचे अंदाजे २० ग्रॅम वजनाच्या लहान मुलांचे बारशातील मिळालेल्या चांदीच्या पट्ट्या असा एकूण १ लाख ५६ हजार ४०० रुपये किमतीची मालमत्ता अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.