Velhe News l मिनल कांबळे l राजगड तालुक्यात ३७ ग्रामपंचाय़तीवर येणार महिलाराज

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील 71 ग्रामपंचायतपैकी 37 ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
        राजगड तालुक्यात नुकतेच सरपंच आरक्षण सोडत वेल्हे येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली प्रांतधिकारी महेश हरिचंद्रे,तहसिलदार निवास ढाणे,निवासी नायब तहसिलदार मयुर बनसोडे,तीर्थगिरी गोसावी,उत्तम आगलावे,प्रसाद धायगावे उपस्थित होते,
ग्रामपंचायतनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
अनुसूचित जाती 
मंजाई आसनी,गोंडेखल

अनुसुचित जाती स्त्री – पाबे,अंबवणे

अनुसुचित जमाती -ओसाडे

अनुसुचित जमाती स्त्री – कादवे,निगडे मोसे,

नागरिकांचा मागास प्रवर्ग -कातवडी,कुरण
 बुद्रुक,चिरमोडी,मालवली,मेटपिलावरे,साईव्ह बुद्रुक,सोंडे सरपाले,खरीव,भट्टी वाघदरा

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री -बोरावळे,मांगदरी,शेणवड,सोंडे कार्ला,हिरपोडी,आंबेड,खामगाव,घोल,कोशिमघर,धानेप
सर्वसाधारण -वांगणीवाडी,आंबेगाव खुर्द,कुरण खुर्द,कोंडगाव,रांजणे,लव्ही बुद्रुक,वडघर,निवी गेव्हंडे,पाल बुद्रुक,वरसगाव,मार्गासनी,करंजावणे,कानंद,केळद,घिसर,टेकपोळे,लाशिरगाव,वांगणी,कोलंबी,कोळवडी,निगडे बुद्रुक,वाजेघर बुद्रुक,

सर्वसाधारण स्त्री -वेल्हे बुद्रुक,गिवशी,माणगाव,मेरावणे,सोंडे माथना,शिरकोली,दापोडे,अंत्रोली,बालवड,मोसे बुद्रुक,वांजळे,सोंडे हिरोजी,हारपुड,कोदवडी,रुळे,विंझर,गुंजवणे,जाधववाडी,वेल्हे खुर्द,साखर,वडगाव झांजे,सुरवड,दामगुडा आसनी 
----------------
 दिनांक 4 मार्च 2025 रोजी मुदत संपलेल्या दामगुडा आसनी,मंजाई आसनी,भट्टी वाघदरा,वडगाव झांजे,सुरवड या ग्रामपंचायतीचे आरक्षण दिनांक 27 फेब्रुवारी 2025 च्या जिल्हाअधिकारी कार्यालयात झालेले आरक्षणात निश्चित करण्यात आले असल्याने 66 ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आल्याची माहीती तहसिलदार निवास ढाणे यांनी दिली.
Tags
To Top