सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील रोटरी क्लब ऑफ सुपे परगण्याच्या अध्यक्षपदी पोपट चिपाडे तर सचिवपदी अशोक बसाळे यांची निवड करण्यात आली. तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा अधिकृत पदग्रहण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रीक्ट गर्व्हनर चारूचंद्र श्रोत्री होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन येथील सरपंच तुषार हिरवे उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन चारूचंद्र श्रोत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुण्यातील डिस्ट्रीक्टचे डाॅ.राजेश दाते, आप्पा इंगळे, पार्श्वेन्द्र फरसोले, बारामतीचे रोटरीचे सचिव महावीर शहा, जगताप,
उपप्रांतपाल राकेश गानबोटे, बारामती रोटरी क्लबचे संचालक पार्श्वेंद्र फरसोले, रविकिरण खारतोडे, सुपे येथील माजी संस्थापक अध्यक्ष सुभाष चांदगुडे, सुपे ग्रामपंचायतीचे सरपंच तुषार हिरवे आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष पोपट चिपाडे, उपाध्यक्ष अरूण कुतवळ, सचिव अशोक बसाळे, खजिनदार प्रतिक चांदगुडे, आनंद कदम, शहाजी चांदगुडे आदी कार्यकारणीची निवड करण्यात आली.
याप्रसंगी रोटरीचे माजी अध्यक्ष सुभाष चांदगुडे, आनंदराव कदम, राजेंद्र ढम, संपत जगताप, डाॅ. श्रीप्रसाद वाबळे, राहुल भोंडवे, हनुमंत चांदगुडे आदी संचालक कार्यकारणीच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
पुढील वर्षीचे नियोजित अध्यक्ष म्हणून अशोक बसाळे यांचे नाव उद्घोषीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक लोणकर यांनी केले. तर अशोक बसाळे यांनी आभार मानले.
................................