पुरंदर l विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही : प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे : श्रीक्षेत्र नारायणपूर येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी  
नारायणपूर (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या 20 लाख रुपये खर्चाच्या कामाचे उद्घाटन  पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे तसेच नारायणपूर मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षिरसागर यांच्या हस्ते  करण्यात आले. 
         यावेळी बोलताना प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, नारायणपूरला विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच नवीन इमारतीच्या फर्निचरचा कामासाठी 20 लाख रुपये मंजूर केल्याचे  दुर्गाडे यांनी जाहिर केले.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस राहुल गायकवाड,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ, पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वामनतात्या जगताप, निरा मार्केट कमिटीचे माजी सभापती शरद जगताप, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष तानाजीराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एम.के.गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख ईश्वर बागमार, महिला अध्यक्षा वंदना जगताप, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष संदेश पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्षा प्रीती जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सासवड शहर अध्यक्ष नीता सुभागडे, विनोद शिंदे ,राहुल जगताप, राम जगताप, पांडुरंग धुमाळ तसेच नारायणपूरचे सरपंच प्रदिप बोरकर, उपसरपंच रेश्मा पोटे,माजी सरपंच चंद्रकांत अनंतराव बोरकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बोरकर,धनश्री झेंडे,प्रज्ञा बोरकर, सुनील क्षीरसागर, संदिप पोमण,बाळासाहेब डांगे, पोलीस पाटील विजय पोमण, ग्रामसेवक दादासाहेब भवर, सदानंद बोरकर, योगेश तावडे, चंद्रकांत बोरकर आदी उपस्थित होते. 
    नारायणपूरचे सरपंच प्रदिप बोरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ग्रामसेवक दादासाहेब भवर यांनी केले. तर आभार राहुल गायकवाड यांनी मानले.

To Top