Today's Gold News ! सोने झाले लखपती...! सोन्याच्या भावाचा नवीन विक्रम : तर चांदीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : महेश जगताप
सध्या बाजारपेठेत मंदी असली तरी सोने- चांदीच्या भावाने आता पर्यंत चे सर्व रेकॉर्ड मोडत 24 कॅरेट सोन्याने एक लाखाचा टप्पा पार करून आज जीएसटीसह 1 लाख 3 हजार सहाशे इतका भाव उच्यांकी भाव गाठला तर चांदीने देखील जीएसटीसह 1 लाख 20 हजार रु. किलो चा टप्पा पार केला असल्याची माहिती महाराष्ट्र सराफ सुवर्णकार फेडरेशन चे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी दिली.
            पुढे बोलताना आळंदीकर म्हणाले सोन्याचे भाव कमी होतील असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तवला जात होता परंतु रशिया - युक्रेन आणि इस्त्राईल मधील युद्धाची वाढलेली व्याप्ती यामुळे बाजारपेठेत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याने व अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने देखील व्याजदरात कपात करण्याची शक्यता वर्तवल्याने अनेक प्रमुख राष्ट्रातील बँकांनी सुरक्षित गुंतवणूक व आकर्षक परतावा मिळण्याच्या शक्यतेमुळे सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरवात केली असल्याने मागणी वाढली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज सोन्याच्या बाजारभावाने उच्च्यांक गाठला.
        भाववाढ अशीच सुरु राहिली तर वर्ष अखेरीस सोन्याचे भाव तोळ्याला 1लाख 30 हजार रु. पर्यंत जातील तर चांदीचे भाव किलोला एक लाख 40 हजार रु. पर्यंत जातील असे हि किरण आळंदीकर यांनी सांगितले. सध्या सराफ बाजारपेठेत अनेक सराफ व्यवसायिकांनी ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना दिलेल्या असल्याने ग्राहकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून दसरा - दिवाळी व लग्न सराई साठी काही ग्राहकांनी आत्ताच बुकिंग सुरु केले असल्याची माहिती पुनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ पेढीचे संचालक शुभम आळंदीकर यांनी दिली.
Tags
To Top