सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
बोपगाव ( ता.पुरंदर ) येथील श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर आषाढ शु.गुरुपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने ऊत्साहात साजरी होणार आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन श्री नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे ,उपाध्यक्ष दिपक फडतरे ,सचिव जयवंत फडतरे ,खजिनदार नागेश फडतरे ,संचालक शिवाजी जगदाळे ,प्रकाश(नाना)फडतरे ,प्रकाश(आप्पा )फडतरे , सुरेश फडतरे ,महादेव फडतरे ,नितीन फडतरे, रमेश फडतरे,मंगेश फडतरे, सोनबा फडतरे, व्यवस्थापक संतोष गोफणे , पांडुरंग बाठे व बोपगावकर ग्रामस्थ करणार आहेत.
दि. १० जुलै रोजी पहाटे ५ ते ६ वा. श्रीनाथांचा अभिषेक, स.६ ते.६.३० महाआरती, स. ७ ते ९ उमेश व महेश साळुंखे हडपसर प्रस्तुत संतांची अभंगवाणी, स. ९ वा. नाथ साहेबांच्या ओव्या गायन ,स.९.३० नाथबाबांची पालखी सोहळा मिरवणूक, स. १० वा. नाथ संचार आखाडा, दु. १२ वा. महा आरती, दु. १२.१५ वा. महाप्रसाद पौर्णिमा मंडळ बोपगाव, संध्याकाळी ७ वा.महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.